विजयी उमेदवारांचे गुन्हेगारी, आर्थिक, शैक्षणिक आणि इतर पार्श्वभूमीचे विश्लेषण
- English report - https://drive.google.com/fil
e/d/18TiPhUDruLrqFXFHNPUMnmxWY uETBD6m/view - मराठी अहवाल - https://drive.google.com/
file/d/1u4CfEqYdAXOHGDAhdoPEQp Njw5nGqpUm/view
संक्षेप आणि ठळक मुद्दे
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांनी 17 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या डहाणू, नंदुरबार आणि नवापूरनगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील (तिसरा टप्पा) 84 पैकी 79 विजयीउमेदवारांचे शपथपत्राचे विश्लेषण केले. बाकीच्या शपथपत्राचे विशलेषण केले नाहीकारण हा अहवाल बनेपर्यंत ते उपलब्ध नव्हते
डहाणू, नंदुरबार आणि नवापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अंतिम पक्षावरस्थिती
Party Name Of Winners
|
Number Of Winners
|
Grand Total
|
||
Dahanu Municipal Council
|
Nandurbar Municipal Council
|
Nawapur Municipal Council
|
||
Bharatiya Janata Party
|
15
|
11
|
0
|
26
|
Nationalist Congress Party
|
8
|
0
|
4
|
12
|
Shivsena
|
2
|
4
|
1
|
7
|
Indian National Congress
|
0
|
24
|
14
|
38
|
Independent
|
0
|
0
|
1
|
1
|
Total
|
25
|
39
|
20
|
84
|
गुन्हेगारी पार्श्वभूमी
- गुन्हेगारी प्रकरणं असलेले विजयी उमेदवार: विश्लेषित केलेल्या 79पैकी 14 (18%) विजयी उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणदाखल असल्याचे घोषित केले आहे.
- गंभीर गुन्हेगारी प्रकरण असलेले विजयी उमेदवार: विश्लेषित केलेल्या79 पैकी 12 (15%) विजयी उमेदवारांनी त्यांच्या विरोधात खुनाचाप्रयत्न, दरोडेखोरी, फसवणूक आणि धमकावणे इत्यादींसारखे गंभीरस्वरुपाचे गुन्हेगारी प्रकरण दाखल असल्याचे घोषित केले आहे.
- गुन्हेगारी प्रकरणं दाखल असलेले पक्षवार विजयी उमेदवार: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या 38 पैकी 5 (13%), भारतीय जनता पक्षाच्या (भाजप)24 पैकी 6 (25%) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राकाँप) 9 पैकी 3(33%) विजयी उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणं दाखलअसल्याचे त्यांच्या शपथपत्रात घोषित केले आहे.
- गंभीर गुन्हेगारी प्रकरणं दाखल असलेले पक्षवार विजयी उमेदवार:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या 38 पैकी 5 (13%), भारतीय जनता पक्षाच्या(भाजप) 24 पैकी 5 (21%) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राकाँप) 9पैकी 2 (22%) विजयी उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हेगारीप्रकरणं दाखल असल्याचे त्यांच्या शपथपत्रात घोषित केले आहे.
- गुन्हेगारी प्रकरणं दाखल असलेले नगर परिषदवार विजयी उमेदवार: .नंदुरबार नगर परिषदेतील 39 पैकी 8 (21%), नवापूर नगर परिषदेतील 20 पैकी 3 (15%) आणि डहाणू नगर परिषदेतील 20 पैकी3 (15%) विजयी उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरणं दाखल असल्याचे त्यांच्या शपथपत्रात घोषित केले आहे.
- गंभीर गुन्हेगारी प्रकरणं दाखल असलेले नगर परिषदवार विजयी उमेदवार: नंदुरबार नगर परिषदेतील 39 पैकी 7 (18%), नवापूर नगर परिषदेतील 20 पैकी 3 (15%) आणि डहाणू नगर परिषदेतील 20 पैकी2 (10%) विजयी उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हेगारी प्रकरणं दाखल असल्याचे त्यांच्या शपथपत्रात घोषित केले आहे.
आर्थिक पार्श्वभूमी
- कोट्यधीश विजयी उमेदवार: विश्लेषित केलेल्या 79 पैकी 29 (37%)विजयी उमेदवार कोट्यधीश आहेत.
- पक्षवार कोट्यधीश विजयी उमेदवार: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 38पैकी 13 (34%), भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) 24 पैकी 9 (38%),राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राकाँप) 9 पैकी 4 (44%) आणि शिवसेनेच्या7 पैकी 3 (43%) विजयी उमेदवार कोट्यधीश आहेत.
- सरासरी मालमत्ता: या निवडणूकीतील विजयी उम्मेदवारांची सरासरीमालमत्ता रु. 1.48 कोटी + इतकी आहे.
- उच्चत्तम मालमत्ता: यशवर्धन मनोज रघुवंशी हे नंदुरबार नगर परिषदेतील प्रभाग क्र. 6अ मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजयी उमेदवार असून त्यांनी आपल्याकडे रु. 18 कोटी पेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे.
- कमी मालमत्ता: 79 पैकी 4 (5%) विजयी उमेदवारांनी त्यांची मालमत्तारु. 2 लाख पेक्षा कमी घोषित केली आहे. महिमा नितेश गावित हीनवापूर नगर परिषदेतील प्रभाग क्र. 10अ मधील भारतीय राष्ट्रीयकाँग्रेसची विजयी उमेदवार असून त्यांनी फक्त रु. 30 हजाराची मालमत्ताअसल्याचे घोषित केले आहे.
- उच्च देणी / कर्ज घोषित करणारे विजयी उमेदवार: भारतीयराष्ट्रीय काँग्रेसची सुरेखा रवींद्र मराठे ही नंदुरबार नगर परिषदेतीलप्रभाग क्र. 7ब मधील विजयी उमेदवार असून त्यांनी रु. 4 कोटी पेक्षा जास्त देणी / कर्ज असल्याचे घोषित केले आहे. 4 (5%) विजेते उमेदवारांनी त्यांचे दायित्व रु. 1 कोटी पेक्षा अधिक असल्याचे घोषित केले आहे.
- पॅन माहिती दिलेले विजयी उमेदवार – सर्व 79 (100%) विजयीउमेदवारांनी पॅन घोषित केले आहे.
इतर पार्श्वभूमीची माहिती
- विजयी उमेदवारांच्या वयाची माहिती: 2 (3%) विजयी उमेदवारांनीत्यांचे वय 21 ते 24 च्या दरम्यान, 8 (10%) विजयी उमेदवारांनी त्यांचेवय 25 ते 30 च्या दरम्यान, 23 (29%) विजयी उमेदवारांनी त्यांचे वय31 ते 40 च्या दरम्यान, 31 (39%) विजयी उमेदवारांनी त्यांचे वय 41 ते50 च्या दरम्यान, 12 (15%) विजयी उमेदवारांनी त्यांचे वय 51 ते 60च्या दरम्यान आणि 3 (4%) विजयी उमेदवारांनी त्यांचे वय 61 ते 70च्या दरम्यान असल्याचे घोषित केले आहे.
- विजयी उमेदवारांची शैक्षणिक